Mohit Kamboj | ‘संजय राऊतांचं राजकारण नेहमीच खालच्या दर्जाचं, मोहित कंबोज यांची टीका

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 01, 2022 | 12:10 AM

संजय राऊत आणि नवाब मलिक हे डबल आयडेंटीटी असलेली माणसं आहेत. मसल पॉवर, मॅन पॉवरचा वापर करत त्यांनी जमिनी हडपल्या, घरं हडपली. संजय राऊत हा खूप शातीर माणूस आहे. मुद्यांना कशी बगल द्याचची, सामनात काय काय करायचं हे नेहमीच त्यांचं काम राहिलंय, असा जोरदार टोला मोहित कंबोज यांनी संजय राऊतांना लगावलाय.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरील कारवाईनंतर भाजप नेते मोहित कंबोज यांनीही खोचक प्रतिक्रिया दिलीय. तपास यंत्रणा आपलं काम करत आहेत. 650 लोकांचं घर तुम्ही हिरावलं. मसलपॉवर वापरुन तुम्ही 100 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. संजय राऊत यांचं राजकारण नेहमी खालच्या दर्जाचं राहिलं आहे. रोज सकाळी उठून सलीम जावेद स्वत:ची स्टोरी घेऊन यायचे. सलीम-जावेदचं मिलन होणारच होतं तो दिवस आता आलाय. याचं कर्म आता जगासमोर आलं आहे. संजय पांडेंचं काय काम होतं ते आता समोर आलं आहे. संजय राऊत आणि नवाब मलिक हे डबल आयडेंटीटी असलेली माणसं आहेत. मसल पॉवर, मॅन पॉवरचा वापर करत त्यांनी जमिनी हडपल्या, घरं हडपली. संजय राऊत हा खूप शातीर माणूस आहे. मुद्यांना कशी बगल द्याचची, सामनात काय काय करायचं हे नेहमीच त्यांचं काम राहिलंय, असा जोरदार टोला मोहित कंबोज यांनी संजय राऊतांना लगावलाय.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI