“विद्याताई, जय श्रीराम”, मोहित कंबोज ट्विटमधून काय सुचवू पाहताहेत?
भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्या यांनाच थेट आव्हान देणारे ट्विट केले आहे.
भाजपचे नेते मोहित कंबोज (Mohit Komboj) हे नेहमी त्यांच्या ट्विटवरुन चर्चेत राहिलेले आहेत. यापूर्वीही सत्तांतरादरम्यानचे त्यांचे ट्विट चर्चेचा विषय ठरले होते. तर मध्यंतरी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यावर कारवाईबाबतचे ट्विट केले होते. हे प्रकरण ताजे असतानाच त्यांनी आपल्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा (Vidya Chavan) विद्या यांनाच थेट आव्हान देणारे ट्विट केले आहे. विद्याताई जय श्रीराम (Jay Shree Ram) या त्यांच्या वक्तव्यावरुन आता राजकीय वर्तुळात नेमके काय होणार याबाबत चर्चा रंगली आहे. बिल्कीस बानो प्रकरणातील 11 जणांना सोडून देण्यात आले आहे. यावर राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेत या विरोधात आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला होता. याबाबत विद्या चव्हाण यांनी पत्रकार परिषदही घेतली होती. राष्ट्रवादीच्या या भूमिकेनंतरच कंबोज यांचे हे ट्विट चा नेमका काय इशारा आहे हे पहावे लागणार आहे.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला

