मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन, बळीराजा सुखावला; राज्यात कुठे बरसल्या पावसाच्या सरी?
VIDEO | येत्या 24 तासात बिपरजॉय हे चक्रीवादळ आणखी तीव्र होणार, हवामान खात्यानं काय म्हटलं?
मुंबई : गरमीने हैराम झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन झालं आहे. राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसण्यास सुरूवात झाली आहे. तर मान्सूने दक्षिण कोकणातील भाग व्यापला आहे. या मान्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावला आहे. यासह दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस पडल्याचे समोर आले आहे. येत्या 24 तासात बिपरजॉय हे चक्रीवादळ आणखी तीव्र होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविलेला आहे. त्यामुळे या वादळाचा फटका हा कोकण किनारपट्टीसह गुजरातच्या किनारपट्टीला देखील बसू शकतो. तर मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईत आज पावसाची शक्यता आहे. 40-50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचीही शक्यता आहे, असा हवामान खात्यानं अंदाज वर्तवला होता.
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी

