Monsoon Update : रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.  जुलै महिन्यात कोकणात जोरदार पाऊस झाला होता. मात्र ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पावसाने दडी मारली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.

अजय देशपांडे

|

Aug 07, 2022 | 10:48 AM

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.  जुलै महिन्यात कोकणात जोरदार पाऊस झाला होता. मात्र ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पावसाने दडी मारली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाकडून कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच या सर्व पार्श्वभूमिवर मच्छिमारांनी खोल समुद्रात जाऊ नये असा इशारा देखील हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें