“17 दारूची दुकानं, गुंडांची साथ यांना पुन्हा तिकीट देऊ नका!”, काँग्रेस खासदाराविरोधात राहुल गांधींकडे तक्रार

आयेशा सय्यद, Tv9 मराठी

Updated on: Nov 29, 2022 | 1:05 PM

काँग्रेस खासदाराविरोधात राहुल गांधी यांच्याकडे तक्रार

काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांच्याविरोधात तक्रारीचा सूर आहे. मोरेश्वर टेमुर्डे पाटील यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना पत्र लिहिलं आहे. खासदार बाळू धानोरकर यांच्याबाबत तक्रार केली आहे. “धानोरकर यांची 17 दारूची दुकानं आहेत. ते मतदार संघात गुंडांना पाठबळ देतात. साथ यांना पुन्हा तिकीट देऊ नका!”, असं आवाहन मोरेश्वर टेमुर्डे पाटील यांनी केलं आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI