मराठा क्रांती ठोक मोर्चाचा आंदोलनाचा इशारा; मुंबई पोलिसांकडून चेंबूरमध्ये बंदोबस्त तैनात
आज मुंबईच्या चेंबूरमध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाचा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. चेंबूरमध्ये पांजरापोळ इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई, 09 ऑगस्ट 2023 | आज मुंबईच्या चेंबूरमध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाचा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. चेंबूरमध्ये पांजरापोळ इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हा इशारा देण्यात आला आहे. मुंबई पोलिसांकडून चेंबूरमध्ये बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मराठा समाजाच्या मागण्यांसाठी चक्काजाम करण्याचा पवित्रा मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. रमेश केरे पाटील यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न आहेत. औरंगाबादमध्ये आज मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला विविध मराठा संघटनांनी पाठिंबा दर्शविला.
Published on: Aug 09, 2023 3:13 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
