‘आमच्या डोक्यावर बसून तुम्हाला मिऱ्या वाटू देणार नाही’, ठाकरे गटाच्या खासदाराचा भाजपला इशारा
राज्यात शिवसेना उद्धव ठाकरे आणि भाजपची युती तुटली. या युतीत आता शिंदे गटाच्या शिवसेनेचा समावेश झाला आहे. तर गेल्या एक वर्षापासून शिवसेना आणि भाजपमध्ये कलगितूरा रंगला आहे.
मुंबई : 23 ऑगस्ट 2023 | गेल्या काही दिवसापासून शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि भाजपमध्ये जोरदार वाकयुद्ध रंगलेले दिसत आहे. याचदरम्यान कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे हटवले जाऊ लागले आहेत. ज्याचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटत आहेत. यावरून ठाकरे गटाचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी भाजपवर तोफ डागली आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेत आशीर्वाद मागता याची लाज वाटत नाही का? असा सवाल केला आहे. तर आता कोणत्याही निवडणूका असू द्या या भाजपला पहिले बाहेर काढा अशी साद पुन्हा एकदा जनतेला घातली आहे. तर भाजपला खडेबोल सुनावताना सावंत यांनी टोला देखील लगावला आहे. सावंत यांनी, मुंबईतील आलात तुम्हाला सामावून घेतलं. पण, आमच्या डोक्यावर बसून तुम्हाला मिऱ्या वाटू देणार नाही, असा इशाराही त्यांनी भाजपला दिला आहे.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

