Bhavna Gawli : खासदार भावना गवळी वर्षभरानंतर मतदारसंघात सक्रिय, नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार

जनतेची कामं करून पाय भक्कम रोवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवसैनिक म्हणून काम करणार आहे. विकासासाठी काम करत राहीन, असं आश्वासन भावना गवळी यांनी दिलं.

गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Aug 13, 2022 | 6:21 PM

खासदार भावना गवळी या एका वर्षानंतर मतदारसंघात आल्या आहेत. काहींनी त्यांचं स्वागत केलं, तर काहींनी त्यांना विरोध केला. माझ्यावर संकट आलं तेव्हा मी कायदेविषयक बाबीत व्यस्त होती. नागरिकांचं प्रेम माझ्यावर आहे. सगळ्यांच्या संपर्कात होती. सर्व कामांवर लक्ष होतं. काही शिवसैनिकांनी विरोध केला. पण, कामानं निवडून आलो. जनतेची कामं करून पाय भक्कम रोवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवसैनिक म्हणून काम करणार आहे. विकासासाठी काम करत राहीन, असं आश्वासन भावना गवळी यांनी दिलं. केंद्रात शिंदे गटाला दोन मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यात भावना गवळी यांचंही नाव आहे. यावर त्या म्हणाल्या, मंत्रिमंडळात स्थान मिळणार की नाही, हा वरिष्ठांचा निर्णय आहे. ते ठरवतील. त्यावर आता भाष्य करणं योग्य होणार नाही.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें