शिवरायांच्या घराण्यातून देण्यात येणारा शिव सन्मान पुरस्कार पंतप्रधान मोदी यांना जाहीर
शिव सन्मान पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः १९ फेब्रुवारी रोजी साताऱ्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. शिव सन्मान पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाल्याची घोषणा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली
मुंबई, ३१ जानेवारी २०२४ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिव सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. शिवरायांच्या घराण्यातून देण्यात येणारा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. शिव सन्मान पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः १९ फेब्रुवारी रोजी साताऱ्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. शिव सन्मान पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाल्याची घोषणा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली. दरम्यान, येत्या १९ फेब्रुवारी रोजी सैनिक स्कूल ग्राउंड सातारा येथे भव्य दिव्य असा एक सोहळा पार पडणार असून या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिव सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. साताऱ्यातील सैनिक स्कूल ग्राउंड येथे होणाऱ्या एका सोहळ्यात खासदार छत्रपती उदयनराजे भोसले निमंत्रक असून त्यांनी तशा पद्धतीची घोषणा देखील केली आहे.
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर

