एखादी शाळापण उघडून दाखवावी – खासदार इम्तियाज जलील

तेलंगणाचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांच्या हस्ते हा भूमीपूजन सोहळा संपन्न होत आहे. या ट्रस्टचे ते अध्यक्ष आहेत. अकबरुद्दीन ओवौसींच्या भाषणाकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असताना खासदार इम्तियाज जलील यांनीदेखील आपल्या भाषणातून मनसे, भाजप आणि शिवसेनेवर तोफ डागली.

रचना भोंडवे

|

May 12, 2022 | 6:24 PM

औरंगाबादः भोंग्यांची भाषा करणाऱ्यांनी शहरातील गरीब विद्यार्थ्यांसाठी एखादी शाळापण खोलून दाखवावी, असं आवाहन एमआयएमचे (MIM) खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी केलंय. गेले काही दिवसांपासून राज्यभरातील मशिदींवरील भोंग्यांवर आक्रमक भूमिका घेणाऱ्या मनसे, भाजपसोबत शिवसेनेच्या नेत्यांनाही खासदार जलील यांनी सुनावलं आहे. औरंगाबादमध्ये (Aurangabad school) तेलंगणा येथील सालार ए मिल्लत एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने गरीबांच्या मुलांसाठी शाळा उघडण्यात येणार आहे. या शाळेच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला आहे. तेलंगणाचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांच्या हस्ते हा भूमीपूजन सोहळा संपन्न होत आहे. या ट्रस्टचे ते अध्यक्ष आहेत. अकबरुद्दीन ओवौसींच्या भाषणाकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असताना खासदार इम्तियाज जलील यांनीदेखील आपल्या भाषणातून मनसे, भाजप आणि शिवसेनेवर तोफ डागली.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें