AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘उत्तर सभा म्हणजे स्वतःवरती अंत्यसंस्कार’; अजित पवार यांच्या बीड येथील सभेला राऊत यांची खोचक टीका

‘उत्तर सभा म्हणजे स्वतःवरती अंत्यसंस्कार’; अजित पवार यांच्या बीड येथील सभेला राऊत यांची खोचक टीका

aslam shanedivan
aslam shanedivan | Updated on: Aug 27, 2023 | 12:20 PM
Share

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज हिंगोलीत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उत्तर सभा बीड येथे होणार आहे. तर राज ठाकरे यांची देखील कोकणात सभा होणार. यादरम्यान दोन ठाकरे आणि अजित पवार काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागलेलं आहे.

मुंबई 27 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादीत गेल्या महिन्यात उभी फूट पडली आणि दोन गट तयार झाले. अजित पवार यांच्या गटात अनेक नेत्यांनी प्रवेश केला. तर शरद पवार यांच्याकडे आता काहीच नेते सोबत आहेत. यावरून शरद पवार आणि त्यांच्या गटाकडून बंडखोरांच्या मतदारसंघात सभा घेतल्या जात आहेत. बीड येथे देखील शरद पवार यांनी 17 ऑगस्टला सभा घेत जोरदार टीका केली होती. त्या टीकेला आज अजित पवार उत्तर देणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची येथे उत्तर सभा होणार आहे. त्याच्याआधी त्यांच्या उत्तर सभेवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

राऊत यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधताना अजित पवारांच्या उत्तरसभेला काहीही महत्व नसल्याचं म्हटलं आहे. तर अजित पवारांची उत्तरसभा म्हणजे स्वत:वरचे अंत्यसंस्कार आणि उत्तरक्रिया असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच त्यांच्या या उत्तर सभ्यांना कोण विचारत नाही अशी देखील टीका त्यांनी केली आहे.

Published on: Aug 27, 2023 12:20 PM

Follow Us
ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनाविरोधात नवनीत राणांचे मोठे पाऊल, आता अमरावतीत होणार हनुमान चालिसा पठण!.

ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनाविरोधात नवनीत राणांचे मोठे पाऊल, आता अमरावतीत होणार हनुमान चालिसा पठण!

ते घर बसल्याच पाठिंबा देतात… मातोश्रीत बसून…; आता अंजली दमानियांचाही ठाकरेंना टोला.

ते घर बसल्याच पाठिंबा देतात… मातोश्रीत बसून…; आता अंजली दमानियांचाही ठाकरेंना टोला

रामरक्षा आंदोलनाचे बॅनर पालिकेने फाडले; ठाकरे गटाचा दावा, नागपूरमध्ये राडा.

रामरक्षा आंदोलनाचे बॅनर पालिकेने फाडले; ठाकरे गटाचा दावा, नागपूरमध्ये राडा

जंतरमंतरवर जाताच अमित ठाकरेंनी वाढवले मोदी सरकारचे टेन्शन…दिल्लीतील आंदोलन देशभर पोहचवण्याची दिली हाक.

जंतरमंतरवर जाताच अमित ठाकरेंनी वाढवले मोदी सरकारचे टेन्शन…दिल्लीतील आंदोलन देशभर पोहचवण्याची दिली हाक

Jayant Patil : सारखं भाजपसोबत जाणार का? अर्थमंत्री होणार का? या प्रश्नांवर जयंत पाटलांनी मोजक्या शब्दात विषयच संपवून टाकला.

Jayant Patil : सारखं भाजपसोबत जाणार का? अर्थमंत्री होणार का? या प्रश्नांवर जयंत पाटलांनी मोजक्या शब्दात विषयच संपवून टाकला

सोनम वांगचुक यांना अटक? बोलता बोलता भाजप नेत्या हे काय बोलून गेल्या? यूजर्सने घेतली फिरकी.

सोनम वांगचुक यांना अटक? बोलता बोलता भाजप नेत्या हे काय बोलून गेल्या? यूजर्सने घेतली फिरकी