शिवाईनगर शाखेवरून राऊत फडणवीस यांच्यात टीकेची धुळवड
राऊत यांनी, खेड येथील उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे म्हणत शिंदे आणि फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे
ठाणे : शिवसेनेत सत्तेवरून संघर्ष पेटल्यानंतर याची धग ठाण्याला लागली होती. ठाण्यात शिवसेना या नावावरून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात वाद झाला होता. त्यानंतर ठाण्यात पुन्हा एकदा शाखेचा वाद ऐरणीवर आला आहे. ठाण्यातील शिवाईनगर येथे शिवसेनेची शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदेची शिवसेना आणि ठाकरे गट आमनेसामने आले आहेत. त्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्याकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असतानाच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली. राऊत यांनी, खेड येथील उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे म्हणत शिंदे आणि फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. तर 365 दिवस शिमगा करणाऱ्यांनी इतर दिवशी शांत रहावे असा पलटवार फडणवीस यांनी केला आहे.

