बेटी बचाओ बेटी पढाओ ! ही तुमची बेटी आहे ? – सुप्रिया सुळे

पुण्यात काल भाजप नेत्या स्मृती ईराणी आल्या होत्या. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी महागाईविरोधात आंदोलन करत स्मृती ईराणी यांचा निषेध नोंदवला. तब्बल दोन ते तीन तास राष्ट्रवादीची उग्र निदर्शने सुरू होती. राष्ट्रवादीचे आंदोलन सुरू झाल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनीही घटनास्थळी येऊन जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की झाली होती.

रचना भोंडवे

|

May 17, 2022 | 5:56 PM

पुणे : पुण्यात काल भाजप (BJP)नेत्या स्मृती ईराणी आल्या होत्या. यावेळी राष्ट्रवादीच्या (NCP) महिला कार्यकर्त्यांनी महागाई (Inflation) विरोधात आंदोलन करत स्मृती ईराणी यांचा निषेध नोंदवला. तब्बल दोन ते तीन तास राष्ट्रवादीची उग्र निदर्शने सुरू होती. राष्ट्रवादीचे आंदोलन सुरू झाल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनीही घटनास्थळी येऊन जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की झाली होती. त्यामुळे वातावरण अधिकच तापलं होतं. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीचा खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र निषेध केला आहे. भाजपनं महिलेवर हात उचलणाऱ्या कार्यकर्त्याला पक्षातून बाहेर काढलं पाहिजे असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी करत घटनेचा तीव्र निषेध केलाय.

 

 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें