नितेश राणे यांच्या गाढू या वक्तव्याचा ठाकरे गटाच्या नेत्याकडून खरपूस समाचार; म्हणाला, ‘नितेश राणे फडतूस’
ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आता लोकसभा निवडणुकीला सामोरं जाण्याचा विचार बोलून दाखवला आहे. तर पक्षाने आदेश दिला तर मैदानात उतरू असे म्हटलं होतं. त्यावरून भाजपसह शिंदे गटातील नेत्यांनी टीका केली होती.
मुंबई : 22 ऑगस्ट 2023 | ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषदेत आपण लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याचे म्हटलं होतं. तर पक्षाने आदेश दिल्यास ईशान्य मुंबईतून निवडणूक लढवू असे संकेत दिले आहे. त्यानंतर त्यांच्यावर भाजप नेते आमदार नितेश राणे आणि शिंदे गटातील मंत्री दीपक केसरकर यांनी घणाघाती टीका केली होती. तर नितेश राणे यांनी रत्नागिरीत खासदार विनायक राऊतांना आम्ही गाडणारच होतो. आता दुसऱ्याही राऊतांना गाढू. दोन्ही राऊतांना गाढू असे म्हटलं होतं. त्यावरून चर्चा सुरू झाली होती. तर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. यादरम्यान राऊत यांनी, नितेश राणेंची लायकी नाही. लायकीप्रमाणे त्यांनी बोललं पाहिजे. तर असल्या या फडतूस लोकांच्या आरोपाला आम्ही काडीची किंमत देत नाही. पण एक मात्र नक्की जर संजय राऊत कोकणामध्ये येऊन लढत असतील तर कोकणवासीय त्यांचं स्वागतच करतील.
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया

