AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्याचं लवकरचं विसर्जण होईल’; ठाकरे गटातील खासदाराची बांगर यांच्यावर जोरदार टीका

‘त्याचं लवकरचं विसर्जण होईल’; ठाकरे गटातील खासदाराची बांगर यांच्यावर जोरदार टीका

aslam shanedivan
aslam shanedivan | Updated on: Aug 27, 2023 | 3:00 PM
Share

हिंगोलीत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज जाहीर सभा होणार आहे. ते या सभेतून बंडखोर नेत्यांचा कोणत्या शब्दात समाचार घेतात याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. मात्र यांच्या आधी शिंदे गट आणि ठाकरे गटात वाकयुद्ध लागले आहे.

हिंगोली : 27 ऑगस्ट 2023 | माजी मुख्यमंत्री तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज हिंगोलीच्या दौऱ्यावर आहेत. ते मराठवाड्यातील पहिली सभा हिंगोलीत घेणार असून यावेळी ते शिंदे गटातील खासदार आणि आमदार यांच्यावर येथून आसूड ओढणार आहेत. पण याच्याआधीच येथील शिंदे गटाचे नेते आमदार संतोष बांगर यांनी ठाकरे यांच्या या सभेवरून जोरदार निशाना साधला आहे.

त्याचबरोबर त्यांनी ठाकरे हे रामलीला त्यांच्या आजूबाजूच्या रावणांचे दहन करतील असे देखील त्यांनी म्हटलं आहे. त्यावरून ठाकरे गटातील नेते खासदार विनायक राऊत यांनी टीका केली आहे. ठाकरे गटातील खासदार राऊत यांनी सभेच्या आधी बांगर यांच्यावर टीका करताना, ठाकरे हे हिंगोलीच्या सभेत शिंदे गटातील या रावणांचं दहन करतील असे म्हटलं होतं.

त्यावर बांगर यांनी पलटवार करताना, मला तसं वाटत नाही. तर ठाकरे हेच हिंगोलीतील सभेत या ऐतिहासीक रामलीला मैदानावर त्यांच्या आजूबाजूला असणारे रावणांचे दहन करतील असं म्हटलं. त्यावरून आता पुन्हा एकदा राऊत यांनी बांगर यांना जोरदार प्रत्युत्तर देताना टीका केली आहे. राऊत यांनी, बांगर सारख्या फुटकळ लोकांना आम्ही किंमत देत नाही असे म्हणतं. त्याचं लवकरच विर्जण होऊल असेही म्हटलं आहे. त्यामुळे आता बांगर यावर कोणती प्रतिक्रिया देतात हे पाहावं लागेल.

Published on: Aug 27, 2023 02:59 PM

Follow Us
भाजपने दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची खरंच अट घातली? CM फडणवीसांचे नाव घेत बड्या नेत्याचे मोठे विधान.

भाजपने दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची खरंच अट घातली? CM फडणवीसांचे नाव घेत बड्या नेत्याचे मोठे विधान

Chanakya Niti: चाणक्य म्हणतात या लोकांच्या चुकीला नका देऊ माफी….

Chanakya Niti: चाणक्य म्हणतात या लोकांच्या चुकीला नका देऊ माफी…

weather update : पाऊस आलारे, अतिमुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट.

weather update : पाऊस आलारे, अतिमुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट

सोनम वांगचुक यांच्या पाठिंब्यासाठी आता शेखर सुमन उतरले, म्हणाले जिंदा लाशों में से एक जीवित.

सोनम वांगचुक यांच्या पाठिंब्यासाठी आता शेखर सुमन उतरले, म्हणाले जिंदा लाशों में से एक जीवित

तुकाराम मुंढे यांचा भाजपच्या बड्या नेत्याला दणका, बनावट गुटखा प्रकरणात जवळच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल.

तुकाराम मुंढे यांचा भाजपच्या बड्या नेत्याला दणका, बनावट गुटखा प्रकरणात जवळच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल

T20 World Cup 2028 स्पर्धेसाठी 12 संघ ठरले, 8 संघ पात्रता फेरीतून ठरणार.

T20 World Cup 2028 स्पर्धेसाठी 12 संघ ठरले, 8 संघ पात्रता फेरीतून ठरणार