AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MPSC Protest : MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं करण्याच्या दिल्या सूचना, मात्र रुपाली पाटील म्हणाल्या...

MPSC Protest : MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं करण्याच्या दिल्या सूचना, मात्र रुपाली पाटील म्हणाल्या…

| Updated on: Oct 08, 2026 | 4:45 PM
Share

पुण्यात MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आज आठवा दिवस आहे. पुणे पोलिसांकडून विद्यार्थ्यांना आंदोलनस्थळ रिकामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. आमदार रोहित पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ एकवटले आहेत.

पुण्यात MPSCच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून, आज आंदोलनाचा आठवा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून आंदोलन स्थळ रिकामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आंदोलन रस्त्यावर सुरू असल्यामुळे पुणेकरांना त्याचा त्रास होत असल्याची याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. त्यामुळे कोर्टाच्या निर्देशानुसार पोलिसांनी ही कारवाई सुरू केली आहे.

आमदार रोहित पवार यांच्यासह अनेक विद्यार्थी या ठिकाणी एकवटलेले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेत्या रुपाली पाटील यांनीही विद्यार्थ्यांच्या बचावासाठी पुढाकार घेतला असून, तुम्हाला कोणीही उठवू शकत नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. पोलिसांनी आंदोलकांना कोणत्याही प्रकारचा जमाव जमवू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा दिला आहे. पोलिसांच्या सीसीटीव्ही व्हॅनमधूनही या सूचना सातत्याने दिल्या जात आहेत. सार्वजनिक वाहतूक आणि शांततेचा भंग होऊ नये, यासाठी ही कार्यवाही केली जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Published on: Oct 08, 2026 04:45 PM

Follow Us