MSRTC Bus Video : बापरे… भरधाव शिवशाही बसचं पुढचं टायर अचानक निघालं, अन् 50 हून अधिक प्रवासी…
भरधाव वेगात असलेल्या शिवशाही बस नागपूरच्या दिशेने जात असताना ही घटना घडली. शिवशाही बसचं पुढचं टायर निघालं सुदैवाने यामध्ये प्रवास करणाऱ्या ५० प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला आहे.
अमरावतीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. अमरावतीवरून नागपूरला जाणाऱ्या भरधाव शिवशाही एसटी बसचं पुढचं टायर आपोआप निघाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. भरधाव वेगात असलेल्या शिवशाही बस नागपूरच्या दिशेने जात असताना ही घटना घडली. शिवशाही बसचं पुढचं टायर निघालं सुदैवाने यामध्ये प्रवास करणाऱ्या ५० प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला आहे. घडलेल्या घटनेचे सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यामुळे एसटी परिवहन महामंडळाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का? असा सवाल केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीवरून नागपूरला जाणाऱ्या भरधाव शिवशाही एसटी बसचं पुढचं टायर आपोआप निघून आलं. भरधाव बसचं टायर निखळल्यानंतर ते लांब अंतरावर गेलं. मात्र सुदैवाने ५० पेक्षा अधिक प्रवाशांचा थोडक्यात जीव वाचला. अमरावती नागपूर महामार्गावर ही धक्कादायक घटना घडली. काही दिवसांपूर्वी परतवाडा आगाराच्या बसचा ही अशाच प्रकारे टायर निघून आल्याचा प्रकार पाहायला मिळाला होता. सातत्याने घडणाऱ्या अशा घटनानंतर एसटी महामंडळाचे बसच्या मेंटेनन्सकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होतोय.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

