‘ये दादा का स्टाईल है…’, माझाच भाऊ माझ्या सोबत नाही; अजित पवारांनी पिकवला हशा
अजित पवारांच्या राष्ट्रवादीत देखील इनकमिंग सुरू झाली आहे. परतूरमध्ये काँग्रेसचे मााजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमातून अजित पवारांनी चांगलीच शाब्दिक बॅटिंग केली आहे.
परतूरमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत काँग्रेसचे मााजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचा पक्षप्रवेश झाला. त्यात पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमातून ईव्हीएमवरून सवाल करणाऱ्या विरोधकांना अजित दादांनी सुनावले आणि लोकसभा निवडणुकीत पत्नी सुनेत्रा पवारांच्या पराभवाच उदाहरण दिले. सुरेश जेथलिया यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आले. मात्र पक्षात इनकमिंगच स्वागत करतानाच अजित पवारांनी नेत्यांना स्वच्छ प्रतिमेवरून कानमंत्रही दिला. अजित पवारांनी कॉन्ट्रॅक्टरच उदाहरण दिलं मराठवाड्यात काम न करताच बिल काढली जातात. कॉन्ट्रॅक्टरांनी राष्ट्रवादीमध्ये येऊच नये असं म्हणत दादांनी एकप्रकारे कॉन्ट्रॅक्टर्स बॅनच केलेत. रोखठोक बोलण्यासाठी अजित पवार ओळखले जातात. आधी स्वतःच्याच घरामध्ये बघितलं पाहिजे हे सांगताना अजित पवारांनी आपल्या सोबतच भाऊ नाही हे सांगताना हशाही पिकवला. ‘स्वतःच्या घरात काय जळते ते पहिले बघितलं पाहिजे ना तर दुसऱ्याच घर तुम्ही शाबूत ठेऊ शकतात. आमच्यातले काही काही पुढारी असे आहेत की त्यांच्या घरातलीच लोकंच त्यांच्याबरोबर नाही आणि बाकीच्यांना उपदेश करायला सांगतात मी तर रेटून बोलायचो पण मी आता दबकत दबकत बोलतोय कारण माझा भाऊ पण माझ्याबरोबर नाही.’, असं अजित पवार म्हणाले. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं

'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध

'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान

'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला
