MSRTC : ‘… तरच एसटी कर्मचाऱ्यांचे 100 टक्के पगार होणार’, महामंडळाची सरकारकडे ‘इतक्या’ कोटींची मागणी
एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचं 56 टक्केच वेतन जमा झालं असून 56 टक्केच वेतनाची रक्कम अपुरी असल्याचे कळतंय. तर एसटी महामंडळाला यंदा शासनाकडून मागणीच्या तुलनेत निम्माच निधी देण्यात आला आहे.
एसटी महामंडळाकडून राज्य शासनाकडे १ हजार कोटी रूपयांची मागणी करण्यात आली आहे. एसटी महामंडळाकडून राज्य शासनाकडे मागितलेले १ हजार कोटी रूपये जर सरकारने दिले तरच एसटी कर्मचाऱ्यांचे पगार हे १०० टक्के होणार असल्याची माहिती आता समोर येत आहे. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांसाठी मार्च महिन्याचं ५६ टक्केच वेतन जमा करण्यात आलं आहे. मात्र एसटी महामंडळाला यंदा शासनाकडून मागणीच्या तुलनेत निम्माच निधी देण्यात आल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण पाहायला मिळत आहे. तर उरलेलं ४४ टक्के वेतन कधी मिळेल याबाबत एसटी कर्मचारी सध्या चिंतेत आहे. अशातच एसटी महामंडळाकडून राज्य शासनाकडे १ हजार कोटी रूपये मागितल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे यंदा मार्च महिन्याचं वेतन रखडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. राज्य शासनाकडून मार्च महिन्याचं वेतन अर्धच आल्याने एसटी कर्मचारी चांगलेच आक्रमक झाले आहे. दरम्यान, पूर्ण पगार द्या अन्यथा आंदोलन करणार, असा इशारा कामगार संघटनांकडून देण्यात आला आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

