MSRTC Employees Strike : लालपरीचे कर्मचाऱ्यांचा आक्रमक पवित्रा, ऐन दिवाळीत आंदोलनाचा इशारा, मागण्या नेमक्या काय?
राज्यातून एक मोठी बातमी आहे. लालपरीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण राज्यभरातील एसटी कर्मचारी येत्या १३ ऑक्टोबरपासून आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.
राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत आंदोलनाचा इशारा दिला आहे. प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत येत्या १३ ऑक्टोबरपासून एसटी कामगारांनी हा एल्गार पुकारला आहे. १३ ऑक्टोबरपासून मध्यवर्ती कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र कामगार संयुक्त कृती समितीच्या बैठकीत एसटी कामगारांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी १३ ऑक्टोबरपासून आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला.
यामध्ये साडेसहा हजार रुपयांच्या वाढीचा फरक, २०१८ पासूनचा महागाई भत्ता, दिवाळी भेट, सणउचल, कायम कर्मचाऱ्यांची भरती, सेवानिवृत्तांचे थकीत देणे यांसह विविध मागण्या तातडीने मंजूर करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा समितीने दिला आहे.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा

