MSRTC : ‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी फक्त ४० कोटी
रा.प.म. अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. एसटी कर्मचाऱ्यांना यंदा मिळणारा पगार हा रखणार असल्याची माहिती समोर येत आहे.
राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी वेतनासंदर्भात एक मोठी आणि टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा पगार यंदा रखडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कारण सरकारकडून एसटी बँकेला केवळ ४० कोटी रूपयांचा निधी देण्यात आल्याची माहिती मिळतेय. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सरकारकडून एसटी बँकेला फक्त ४० कोटी रूपयेच देण्यात आल्याने हा संभ्रम निर्माण झाला आहे. तर राज्यभरातील राज्य परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी आवश्यक असणाऱ्या निधीपेक्षा ही रक्कम पुरेशी नाही. त्यामुळे सरकारकडून एसटी बँकेला देण्यात आलेला ४० कोटी रूपयांचा हा निधी एसटी कर्मचाऱ्यांना वेतन देण्याइतका पुरेसा नाही, असं मत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केलं आहे. तर वेतनासाठी पुरेसा निधी देण्यात यावा अशी मागणी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

