MSRTC : ‘लालपरी’नं प्रवास करताय? तुमच्यासाठी दिलासादायक बातमी; प्रवास करताना एसटी बिघडली तरी ‘नो टेन्शन’, कारण…
राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस काही कारणाने बिघाडल्यास आता उच्च श्रेणीच्या बसेसमधून प्रवास करताना तिकीट भाड्याचा फरक वसुल करु नये, असे आदेश एसटी महामंडळाने जारी केले आहे.
तुम्ही लालपरीने प्रवास करतात का? एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि रस्ता तिथे एसटी असं ब्रीद वाक्य असणाऱ्या एसटी महामंडळाच्या प्रवाशांना आता दिलासा मिळणार आहे. कारण प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवास करताना बस बिघडली तर आता एसी एसटीने प्रवास करता येणार आहे. साध्या एसटी बसच्या तिकीट किंवा पासवर एसी बसने प्रवास करता येणार आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करताना एसटी बिघडली तरी आता ‘नो टेन्शन’ असं म्हणायला हरकत नाही. काही वेळेला एसटी बसने प्रवास करताना काही वेळा तांत्रिक कारणाने बसेस बंद पडत असतात. अशा वेळी त्याच मार्गावरुन येणाऱ्या बसेसमधून प्रवाशांना प्रवास करण्याची मूभा महामंडळाकडून असते. परंतू अनेकदा त्याच मार्गावर उच्च श्रेणीची बस आल्यास तिकीटाचा फरक प्रवाशांकडून वसुल केला जात होता. मात्र यापुढे एसटी बस प्रवास सुरू असताना वाटेत बंद पडल्यास पुढील बस उच्च श्रेणीची असली तरी प्रवाशांना तिकीटाचा फरक आकारण्यात येणार नाही. त्याच तिकीटावर एसटीतून प्रवास करता येणार आहे.

पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल

दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय

साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा

मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?
