राज ठाकरेंसमोर एसटी कर्मचाऱ्याने व्यथा मांडल्या, ऐका भीषण वास्तव!

| Updated on: Nov 11, 2021 | 2:44 PM

आज 37 कामगार गेले. उद्या हा आकडा 370 होईल. त्यामुळे साहेब, तुम्हीच या प्रकरणात लक्ष घाला. तुम्हीच आमचे तारणहार आहात, असा आर्त टाहो एसटी कामगारांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसमोर फोडला.

Follow us on

साहेब, तुम्हाला हातजोडून विनंती आहे… आम्हाला सातवा वेतन आयोग लागू करा. मग विलिनीकरणाची प्रक्रिया सुरूच राहिल. पण आता वेतन आयोग लागू झाला नाही. पगार वाढला नाही तर आज 37 कामगार गेले. उद्या हा आकडा 370 होईल. त्यामुळे साहेब, तुम्हीच या प्रकरणात लक्ष घाला. तुम्हीच आमचे तारणहार आहात, असा आर्त टाहो एसटी कामगारांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसमोर फोडला.