Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांना धमकी; हे दोघे अटकेत
आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांना धमकावणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. यात एक विद्यार्थी असल्याचे समोर आले आहे. अंबानी यांना सलग चौथ्यांदा धमकवण्यात आले. खंडणी न दिल्यास परिणामांसाठी तयार रहा, असे धमकावणाऱ्याने मेलमध्ये म्हटलं होेते. 400 कोटींच्या खंडणीसाठी हे धमकीसत्र सुरु होते.
मुंबई, ४ नोव्हेंबर २०२३ | प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना धमकी दिल्याप्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. सलग चौथ्यांदा धमकी देण्यात आल्याने पोलिसांनी तपासाला वेग दिला. यावेळी परिणामांसाठी तयार रहा, अशी धमकी देण्यात आली होती. इतकेच नाही तर तब्बल ४०० कोटी रूपयांच्या खंडणीची मागणी देखील मुकेश अंबांनी यांना धमकवणाऱ्याने केली आहे. यापूर्वी मुकेश अंबानी यांनी २७ ऑक्टोबर रोजी पहिला धमकीचा ईमेल आला होता. यामध्ये धमकी देणाऱ्याने २० कोटींची मागणी केली होती. त्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी २८ ऑक्टोबरला आलेल्या धमकीच्या मेलमध्ये 200 कोटींची मागणी करण्यात आली. तर 30 ऑक्टोबर रोजी आलेल्या तिसरा मेलमध्ये ४०० कोटींची खंडणी मागण्यात आली होती. प्रकरणात अटक करण्यात आलेल्यापैकी एक जण हा बी.कॉमचा विद्यार्थी असून त्याला गुजरातमधून अटक करण्यात आली आहे.
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...

