VIDEO : Mumbai Fire | अविघ्न पार्क टॉवरला आग, जीव वाचवण्याच्या नादात इमारतीच्या बाल्कनीतून पडला तरुण

मुंबईतील करी रोड परिसरातील रहिवासी इमारतीला मोठी आग लागली आहे. लोअर परेल स्टेशनजवळ असलेल्या अविघ्न टॉवर या साठमजली इमारतीमध्ये 19 व्या मजल्यावर आग लागली. आगीनंतर इमारतीतून जीव वाचवण्याचा प्रयत्न करणारा एक रहिवासी बाहेर लटकत होता, मात्र यावेळी तो उंचावरुन खाली पडल्याची दृश्यं कॅमेरामध्ये कैद झाली आहेत.

मुंबईतील करी रोड परिसरातील रहिवासी इमारतीला मोठी आग लागली आहे. लोअर परेल स्टेशनजवळ असलेल्या अविघ्न टॉवर या साठमजली इमारतीमध्ये 19 व्या मजल्यावर आग लागली. आगीनंतर इमारतीतून जीव वाचवण्याचा प्रयत्न करणारा एक रहिवासी बाहेर लटकत होता, मात्र यावेळी तो उंचावरुन खाली पडल्याची दृश्यं कॅमेरामध्ये कैद झाली आहेत. इमारतीला आग लागल्यानंतर इमारतीतील रहिवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यानंतर जीव वाचवण्याचा प्रयत्न करताना एक जण इमारतीच्या बाल्कनीत गेला. मात्र जीव वाचवण्याच्या नादात हात सुटून तो रहिवासी थेट खाली कोसळल्याची माहिती आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI