AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

56 फुटले, ठाकरेंनी 66 निवडून आणले! मुंबई महापालिकेत कोण सरस?

56 फुटले, ठाकरेंनी 66 निवडून आणले! मुंबई महापालिकेत कोण सरस?

| Updated on: Jan 18, 2026 | 11:28 AM
Share

मुंबई महापालिकेत पहिल्यांदाच भाजपचा महापौर विराजमान होणार असून, ठाकरेंची अडीच दशकांची सत्ता संपुष्टात आली आहे. पक्षफुटीनंतरही उद्धव ठाकरेंनी कडवी झुंज देत अनपेक्षित यश मिळवले, तर शिंदे गटाला अपेक्षित यश मिळाले नाही. मराठी मतांच्या ध्रुवीकरणाने या निवडणुकीत आपले महत्त्व सिद्ध केले.

मुंबई महानगरपालिकेत प्रथमच भाजपचा महापौर विराजमान होणार असून, ठाकरेंची अडीच दशकांची सत्ता संपुष्टात आली आहे. हा भाजपसाठी ऐतिहासिक विजय मानला जात आहे. मात्र, पक्ष आणि अनेक नगरसेवकांनी साथ सोडल्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी दिलेली झुंज मुंबईत चर्चेचा विषय ठरली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली. त्यानंतर ठाकरेंकडे अवघे ३८ माजी नगरसेवक उरले होते. तरीही त्यांनी निवडणुकीत ६६ नगरसेवक निवडून आणले. याउलट, शिंदे यांनी घेतलेल्या ५७ नगरसेवकांपैकी केवळ २९ नगरसेवक जिंकून आले. यामुळे, पक्षफुटीनंतरही ठाकरे गटाने आपली ताकद दाखवून दिली आहे. जरी मुंबई महापालिकेवरील सत्ता गमावली असली तरी, मुंबईतील शिवसेना ही अजूनही ठाकरेंचीच ही ओळख कायम असल्याचे या निकालातून अधोरेखित झाले आहे.

Published on: Jan 18, 2026 11:28 AM