AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांसाठी मोठी बातमी... मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सकाळीच प्रवाशांना मनस्ताप, कुठं बिघाड?

मुंबईकरांसाठी मोठी बातमी… मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सकाळीच प्रवाशांना मनस्ताप, कुठं बिघाड?

| Updated on: May 21, 2024 | 10:31 AM
Share

कल्याण डोंबिवली रेल्वे स्थानकावर चाकरमान्यांची मोठी गर्दी झाली होती. सकाळी ऑफिसला जाण्याची वेळ असल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा झाल्याने त्यांच्यात नाराजीचा सूर दिसतोय. आज मंगळवारी सकाळी ७.३० ते ८ च्या सुमारास तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला.

मुंबईकरांसाठी मोठी बातमी आहे. आठवड्याच्या दुसऱ्याच दिवशी पुन्हा एकदा मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर येत आहे. टिटवाळा ते सीएसएमटीला जाणाऱ्या ट्रेन 20 मिनिटे उशीराने धावत आहेत. तांत्रिक कारणामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याचे सांगितले जात आहे. यामुळे कल्याण डोंबिवली रेल्वे स्थानकावर चाकरमान्यांची मोठी गर्दी झाली होती. सकाळी ऑफिसला जाण्याची वेळ असल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा झाल्याने त्यांच्यात नाराजीचा सूर दिसतोय. आज मंगळवारी सकाळी ७.३० ते ८ च्या सुमारास तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला. टिटवाळा ते सीएसएमटी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील सर्वच ट्रेन १५ ते २० मिनिटे उशीराने धावत असल्याने सकाळी ऑफीसच्या दिशेने निघालेल्या नागरिकांन मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. अशातच ठाणे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ समोरील जाहिरात फलकाला आग लागल्याने तिथे प्रवाशांची गर्दी झाली होती. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेतली आणि ही आग विझवण्यात त्यांना यश मिळालं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.

Published on: May 21, 2024 10:31 AM