Aryan Khan | आर्यन खानच्या अडचणीत वाढ, शाहरुख खानचा स्पेन दौरा रद्द

किंग खान शाहरुख खानच्या मुलाच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. कारण, मुंबईतील क्रुझ पार्टीचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघड होत असल्याचा दावा एनसीबीच्या वकिलांनी आज कोर्टात केलाय. तब्बल अडीत तास चाललेल्या युक्तिवादानंतर आर्यन खानसह अन्य दोन आरोपींना 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे.

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानच्या मुलाच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. कारण, मुंबईतील क्रुझ पार्टीचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघड होत असल्याचा दावा एनसीबीच्या वकिलांनी आज कोर्टात केलाय. तब्बल अडीत तास चाललेल्या युक्तिवादानंतर आर्यन खानसह अन्य दोन आरोपींना 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे.

जवळपास अडीच तासापेक्षा जास्त वेळ कोर्टात युक्तीवाद झाला. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टाने 7 ऑक्टोबरपर्यंत आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेजा या तिघांना कोठडी सुनावली. या तिघांच्या चौकशीतून काय माहिती समोर येईल ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सतीश मानेशिंदे यांनी कोर्टात युक्तीवाद करताना याआधीच्या अनेक प्रकरणांचा संदर्भ दिला. ड्रग्ज प्रकरणात कशाप्रकारे सेक्शन लावले जातात, याबाबतची माहिती दिली होती. कोर्टाने एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना आरोपींच्या कोठडीबाबत विचारलं तेव्हा त्यांनी कोठडी हवी असल्याचं सांगितलं. त्यानंतर कोर्टाने 7 तारखेपर्यंत कोठडी सुनावली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI