Nana Patole | हिंदू-मुस्लिम वादासाठी शाहरुखच्या मुलाला अटक : नाना पटोले

मुंबई ड्रग्स प्रकरणात सध्या न्यायालयीन कोठडीत असलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान प्रकरणात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठं वक्तव्य केलंय. हिंदू-मुस्लिम वादासाठी शाहरुखच्या मुलाला अटक करण्यात आली. देशात हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाचा कट शिजत असल्याचा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केलाय. पटोले यांच्या या वक्तव्यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही, ते चुकीचे करतील त्यावर कारवाई झाली पाहिजे. पण अदानी मुंद्रा बंदरावर 3000 हजार किलो अंमली पदार्थ सापडले त्याचे काय झाले. त्याच्यावर काहीच कारवाई केली जात नाही. आपल्या उद्योगपती मित्रांना वाचवण्यासाठी व अदानी मुंद्रा बंदरावर सापडलेल्या अंमलपदार्थाच्या मोठ्या साठ्यावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी मुंबईत कारवाया केल्याचे दाखवले जात आहे. मुंबईतील एनसीबीच्या कारवाया म्हणजे ‘दाल मे कुछ काला है…’ असे वाटते. शाहरुख खानच्या मुलाला एनसीबीने अटक केली त्याला हिंदु मुस्लीम रंग देण्याचा अत्यंत हिन प्रयत्न भाजपाकडून होत असल्याचेही पटोले म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI