Ganpati Visarjan 2025 : ढोल ताशांचा गजर.. गुलालाची उधळण…. मुंबईचा राजा अन् तेजुकाया विसर्जनासाठी मार्गस्थ
आज सकाळपासून मुंबईत पावसाने देखील गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे. पाऊस पडत असताना देखील आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्त मोठी गर्दी करतायत
गेली दहा दिवस गणपती बाप्पाच्या आगमनाने मुंबईसह राज्यात आनंदाचं आणि जल्लोषाचं वातावरण बघायला मिळत आहे. या दहा दिवसात आराध्य दैवत असणाऱ्या लाडक्या गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करण्यात आली. मात्र या दहा दिवसानंतर जो क्षण मनाला हळवं करतो, जो क्षण नकोसा वाटतो तो क्षण आज आलाय…. आज मुंबईसह राज्यभरात बाप्पाचं विसर्जन करण्यात येतंय. मुंबईतील गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, जुहू चौपाटींसह इतर विसर्जन स्थळं सज्ज झाली असून सार्वजनिक मंडळांचे बाप्पा देखील ढोल ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत विसर्जनासाठी मार्गस्थ झालेत.
Published on: Sep 06, 2025 11:07 AM
Latest Videos
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला

