AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Weather | मुंबईत उष्णतेचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी तापमान 35 अंशांच्या पार, तर ह्या भागात पावसाची शक्यता....

Mumbai Weather | मुंबईत उष्णतेचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी तापमान 35 अंशांच्या पार, तर ह्या भागात पावसाची शक्यता….

| Updated on: May 11, 2026 | 12:27 PM
Share

मुंबईसह संपूर्ण कोकण पट्ट्यात उष्णतेची तीव्रता वाढताना दिसत आहे. सलग तिसऱ्या दिवशी मुंबईतील तापमानाचा पारा 35 अंशांच्या पुढे पोहोचल्याने मुंबईकरांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असून, नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई उपनगरांमध्येही उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत असून, दिवसभर दमट आणि उकाड्याचे वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. आजही मुंबईकरांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
दरम्यान, मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद होत आहे. काही भागांमध्ये तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासोबतच हवामान खात्याने कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता देखील व्यक्त केली आहे. ठाणे जिल्हा वगळता इतर अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज असून, काही भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Published on: May 11, 2026 12:27 PM
Follow Us