Mumbai Rain : मुंबईत मुसळधार, अंधेरी सबवे पाण्याखाली; वाहतूक कोंडी
Mumbai Rain News Update: मुसळधार पावसामुळे आज मुंबईत पाणी तुंबायला सुरुवात झाली असून वाहतूक कोंडी बघायला मिळत आहे.
आज सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. विशेषतः पश्चिम उपनगरात गेल्या अर्ध्या तासापासून जोरदार पाऊस सुरू आहे. ज्यामुळे अंधेरी सबवेमध्ये दोन ते तीन फूट पाणी साचले आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. आज पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरवात झाली आहे. सखल भागात असलेला हा सबवे पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अंधेरी पोलिस आणि वाहतूक पोलिसांनी सबवेबाहेर बॅरिकेड्स लावून तो बंद केला आहे.
अंधेरी सबवे बंद झाल्यामुळे अंधेरी पूर्व आणि पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना गोखले पुलाचा पर्यायी मार्ग वापरण्याची सूचना केली आहे. दरम्यान, मुंबईतील इतर सखल भागांमध्येही पाणी साचण्यास सुरुवात झाली असून, यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा

