Nashik Rain : गोदाघाट परिसरात पाण्याच्या पातळीत वाढ; दुतोंड्या मारुती कंबरेपर्यंत पाण्यात
Nashik Flood Situation : गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सध्या वाढवण्यात आलेला आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
चंदन पूजाधिकारी, प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यात यंदा पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून, यामुळे धरणांमधील पाणीसाठा 68 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. सध्या जिल्ह्यातील 9 धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान, गोदावरी नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सध्या वाढवण्यात आलेला आहे. गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात काल सकाळपासूनच मुसळधार पावसाच्या सरी बरसत आहेत. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे. सध्या धरणातून 5 हजार 186 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपत्रात केला जात आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नाशिकच्या रामकुंड परिसरात गोदावरी नदीत पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक मंदिरं पाण्याखाली गेलेली असून पुर पातळी मोजण्याची खून समजली जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या कंबरेला पाणी लागलं आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

