Shahrukh Khan Son Bail | Aryan Khan ला जामीन मंजूरीनंतर शाहरुखच्या ‘मन्नत’ बाहेर चाहत्यांचा जल्लोष

मुंबई ड्रग्स प्रकरणात अखेर अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयात तीन दिवस दोन्ही बाजूचा युक्तिवाद चालला. त्यानंतर आज उच्च न्यायालयाने आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धनेचा यांना जामीन मंजूर केला आहे. आर्यन खानला जामीन मंजूर होताच शाहरुखच्या मन्नत या बंगल्याबाहेर चाहत्यांनी दिवाळी साजरी केली. बॅनर झळकावून आणि फटाके फोडून शाहरुख खानच्या चाहत्यांना आनंद व्यक्त केलाय.

मुंबई ड्रग्स प्रकरणात अखेर अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयात तीन दिवस दोन्ही बाजूचा युक्तिवाद चालला. त्यानंतर आज उच्च न्यायालयाने आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धनेचा यांना जामीन मंजूर केला आहे. आर्यन खानला जामीन मंजूर होताच शाहरुखच्या मन्नत या बंगल्याबाहेर चाहत्यांनी दिवाळी साजरी केली. बॅनर झळकावून आणि फटाके फोडून शाहरुख खानच्या चाहत्यांना आनंद व्यक्त केलाय. दरम्यान, आज जामीन मंजूर करण्यात आला असला तरी हे तिघेही आज कारागृहाबाहेर पडण्याची शक्यता कमी आहे. त्याबाबत आर्यन खानचे वकील मुकूल रोहतगी यांनी माहिती दिलीय.

आर्यन खान कारागृहाबाहेर कधी येणार?

मुंबई उच्च न्यायालयाने तिनही आरोपींना जामीन दिला आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. माननीय उच्च न्यायालयाने जवळपास तीन दिवस दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत उद्या मिळेल आणि मला आशा आहे की हे तिघेही उद्या संध्याकाळपर्यंत किंवा शनिवारी बाहेर येतील, अशी माहिती आर्यन खानचे वकील मुकूल रोहतगी यांनी दिली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI