Video : वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर कुरार विलेज इथं CNG इंडिका जळून खाक! थरारक व्हिडीओ समोर

कुरार विलेज, मालाड पूर्व इथं ही घटना घडली. कारला आग लागल्यानं या मार्गावरची वाहतूक काही काळ थांबवून ठेवण्यात आली होती.

गोविंद ठाकूर

| Edited By: सिद्धेश सावंत

Aug 13, 2022 | 8:35 AM

मुंबई : उन्हाळ्यात गाड्यांना भररस्त्यात आग (Car Burn) लागण्याच्या घटना सर्रास घडताना दिसून येतात. आता पावसातही एका कारला भररस्त्यात आग लागली. या आगीत कार जळून खाकही झाली. ही घटना घडली मुंबईच्या कुरार स्टेशन रोड (Kurar Village News, Malad East) परिसरामध्ये. एका इंडिका कारला अचानक आग लागली. यानंतर रस्त्यावरच अग्निकल्लोळ पाहायला मिळाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीनं घटनास्थळी दाखल होत आग विझवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. यामुळे कुरार मार्गावरची वाहतूक खोळंबली होती. अचानक गाडीला आग लागल्यानं गाडीतील चालकही भांबावून गेला होता. आग लागलेली इंडिया कार (Indica CNG) ही एक सीएनजी कार होती. कुरार विलेज, मालाड पूर्व इथं ही घटना घडली. कारला आग लागल्यानं या मार्गावरची वाहतूक काही काळ थांबवून ठेवण्यात आली होती. त्यामुळे लांबच लांब वाहनांच्या रांगा हायवेवर लागलेल्या होत्या.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें