Mumbai Megablock | मुंबईकरांनो आज रेल्वेने प्रवास करताय? मग हा व्हिडीओ नक्की बघा
VIDEO | मुंबईकरांनो रेल्वेने प्रवास करणार असाल तर थांबा...तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे
मुंबई : आज मुंबईच्या तिन्ही रेल्वेमार्गिकांवर आज रेल्वेप्रशासनाकडून मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. देखभाल आणि दुरुस्तीच्या कारणास्तव हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते विद्याविहार अप-डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे तर हार्बर मार्गावर वाशी ते पनवेल अप-डाऊन मार्गावर सकाळी 11 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक हा घेण्यात येणार आहे. त्याचसोबत पश्चिम रेल्वे मार्गावर 14 तासांचा विशेष असा ब्लॉक घेण्यात येणार आहे. जोगेश्वरी ते गोरेगावच्या दरम्यान पुलावर गर्डर टाकण्याच काम सुरू आहे त्यामुळे हा 14 तांसाचा विशेष मेगाब्लॉक काल आणि आज घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल तर मुंबई लोकलच वेळापत्रक बघून बाहेर पडा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी

