Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट रेल्वे रुळावरच… पहा व्हिडीओ
मुंबईत संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. शहरासह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस कोसळत असल्याने अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले. दादर परिसरातील रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे लोकल सेवा काही ठिकाणी संथ गतीने सुरू होती.
मुंबईत संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. शहरासह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस कोसळत असल्याने अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले. दादर परिसरातील रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे लोकल सेवा काही ठिकाणी संथ गतीने सुरू होती. त्यामुळे सकाळच्या वेळेत कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. मुंबई लोकल सेंट्रल, हर्बल, आणि पश्चिम तीन्ही मार्गांवरील ट्रेन 10 ते 15 मिनीटे उशीराने धावत आहेत.
ईस्टर्न एक्सप्रेस वेवरही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. मुसळधार पावसामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अनेक वाहनचालकांना तासन्तास ट्रॅफिकमध्ये अडकून पडावे लागले. मुंबईतील काही रस्ते जलमय झाल्याने बस आणि रिक्षा वाहतुकीवरही परिणाम झाला.
हवामान विभागाने पुढील 24 तासांत मुंबई आणि परिसरात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. प्रशासनाने नागरिकांना आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. तसेच समुद्र किनाऱ्यालगत राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबई महानगरपालिका आणि आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या आहेत.
Published on: Jul 02, 2026 08:54 AM
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का

