Mumbai Mayor | मुंबई बाहेर जाऊ नका… महापौरपदाच्या निवडणुकीत गडबड होऊ नये म्हणून ठाकरेंचे नगरसेवकांना व्हीप

ठाकरे शिवसेनेच्या गटनेत्या किशोरी पेडणेकर यांच्याकडून व्हीप जरी करण्यात आले आहे. जारी करण्यात आलेल्या व्हीपनुसार 15 फेब्रुवारीपर्यंत कोणत्याही नगरसेवकाने मुंबई शहराबाहेर जाऊ नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी येत्या 11 फेब्रुवारी रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून शिवसेना (ठाकरे गट) कडून अधिकृतपणे व्हीप जारी करण्यात आला आहे. ठाकरे शिवसेनेच्या गटनेत्या किशोरी पेडणेकर यांच्याकडून व्हीप जरी करण्यात आले आहे. जारी करण्यात आलेल्या व्हीपनुसार 15 फेब्रुवारीपर्यंत कोणत्याही नगरसेवकाने मुंबई शहराबाहेर जाऊ नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
विशेष बाब म्हणजे, यंदा कोकणातील नगरसेवकांना 9 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आंगणेवाडी जत्रेला उपस्थित राहता येणार नाही, अशी शक्यता आहे. कारण 11 फेब्रुवारी रोजी महापौर निवडणूक असून त्याआधी 7 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे नगरसेवकांची उपस्थिती मुंबईत अनिवार्य करण्यात आली आहे.
दरम्यान, महापौर पदासाठी निवडणूक लढवली जाणार की ती बिनविरोध होणार, याबाबत अद्याप चित्र स्पष्ट झालेले नसले तरी सर्वच राजकीय पक्षांकडून रणनीती आखली जात असल्याचे संकेत मिळत आहेत. महापौर निवडणुकीच्या निमित्ताने मुंबईच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी हालचाल सुरू झाली असून, येत्या काही दिवसांत राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.