AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramayana Mistakes: आदिनाथ कोठारे स्टारर ‘रामायण’ वादाच्या भोवऱ्यात, दिग्दर्शकाकडून झाल्यात ‘या’10 मोठ्या चुका; चाहत्यांची निराश!

Ramayana Mistakes: अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेता आदिनाथ कोठारे स्टारर 'रामायण' सिनेमा दोन भागात प्रदर्शित होणार आहे. पण सिनेमात दिग्दर्शकाने अशा 10 मोठ्या चुका केल्या आहेत, ज्यामुळे सिनेमा पाहिल्यानंतर चाहत्यांच्या पदरी फक्त निराशा पडली आहे.

Ramayana Mistakes: आदिनाथ कोठारे स्टारर 'रामायण' वादाच्या भोवऱ्यात, दिग्दर्शकाकडून झाल्यात 'या'10 मोठ्या चुका; चाहत्यांची निराश!
Ramayana
| Updated on: Nov 14, 2026 | 7:57 AM
Share

Ramayana Mistakes: रणबीर कपूर, आदिनाथ कोठारे, यश, साई पल्लवी अशी तगडी स्टारकास्ट असलेला ‘रामायण’ सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करताना दिसत आहे. प्रदर्शनानंतर अवघ्या 9 दिवसांत सिनेमाने 1000 कोटी रुपयांचा गल्ला पार केला असला तरी, सिनेमाच्या कथेने प्रेक्षकांना निराश केलं आहे. दिग्दर्शकाने सिनेमात असे सीन दाखवले आहेत, ज्यामुळे असं कळत आहे की, सिनेमा तयार करण्यापूर्वी संबंधित विषयाचा अभ्यास केलाच नाही. ज्यामुळे 4000 कोटी रुपयांच्या बजेटवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सिनेमात असे 10 सीन आहेत, ज्यामुळे आता सिनेमाच्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे.

रावणाला दशानन नाव कधी पडलं?

‘रामायणम् पार्ट 1′ मध्ये जेव्हा रावणाची एन्ट्री होते, तेव्हा त्याची आई कैकसी त्याला ‘दशानन’ म्हणून हाक मारते. पण यामागचा इतिहास वेगळा आहे. त्यावेळी रावणाला दशानन हे नाव पडलंच नव्हतं. रावणाने जेव्हा ब्रह्मदेवांकडून वरदान मिळवण्यासाठी तपश्चर्या केली होती, तेव्हा त्याने 9 वेळा स्वतःचं शिर कापून अग्नीत अर्पण केलं होतं. त्यावर ब्रह्मदेवांनी प्रसन्न होऊन त्याला केवळ मनासारखे वरदानच दिले नाही, तर त्याचे 9 मस्तकेही परत दिली. यानंतरच त्याचे नाव ‘दशानन’ पडले होतं.

विद्युतजिव्हाचा वध चुकीच्या पद्धतीने दाखवला

सिनेमात दाखवल्याप्रमाणे, रावणाने भरसभेत दासीचा आणि स्वतःचा अपमान झाल्यानंतर विद्युतजिव्हाला आव्हान देऊन त्याच्याशी युद्ध केलं आणि त्याला ठार मारले. परंतु प्रत्यक्षात रावणाने विद्युतजिव्हाची हत्या तेव्हा केली होती, जेव्हा तो विश्वविजयासाठी निघाला होता आणि विद्युतजिव्हा त्याच्या विरोधी गटातील ‘कालकेय’ राक्षसांच्या बाजूने युद्ध लढत होता. त्यावेळेपर्यंत रावणाला हे माहीतही नव्हते की विद्युतजिव्हा हा त्याची बहीण शूर्पणखा हिचा पती आहे. असं देखील सांगितलं जातं की, जेव्हा शूर्पणखाला पतीच्या हत्येबद्दल समजतं, तेव्हा ती रावणाच्या वंशाचा सर्वनाश करण्याची शपथ घेते आणि याचाच परिणाम म्हणून राम-रावण युद्ध पाहायला मिळतं.

प्रभू श्रीराम आणि त्यांच्या भावांचा विवाह

सिनेमात दाखवल्याप्रमाणे, प्रभू श्रीराम सीतेला सांगतात की त्यांनी आपल्या भावांना वचन दिलं आहे की चारही भाऊ एकाच मंडपात विवाह करतील. यावर माता सीता त्यांना मागे वळून पाहण्यास सांगतात आणि ते पाहतात की लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न वेगवेगळ्या राजकन्यांसोबत उभे आहेत. यानंतर चारही भावांचा विवाह दाखवण्यात आला आहे.

भगवान परशुराम यांचा सिक्वेंस चुकीचा दाखवला आहे

सिनेमात जेव्हा भगवान परशुराम तेव्हा येतात, जेव्हा भगवान राम आपल्या तिन्ही भावांसह विवाह करून पत्नी, आई-वडील आणि सर्व अयोध्यावासीयांसोबत आपल्या घरी परतत असतात. पण प्रत्यक्षात भगवान परशुराम शिवधनुष्य तुटवल्याचा आवाज ऐकून राजा जनकांच्या सभेत पोहोचले होते. तिथे त्यांचे आणि लक्ष्मणाचे वाद-विवाद होतात. तसेच, भगवान राम आपले विष्णू रूप दर्शन घडवतात आणि परशुराम यांचा क्रोध शांत होतो.

राजा दशरथ यांनी कैकयीला दिलेलं वचन

‘रामायणम्’नुसार, राजा दशरथ यांनी कैकयीशी विवाह करताना त्यांच्या वडिलांना एक वचन दिलं होतं की, त्यांच्या मुलीपासून होणारा मुलगा अयोध्येचा राजा होईल. परंतु प्रत्यक्षात, देवासुर संग्रामाच्या वेळी जेव्हा कैकयी यांनी राजा दशरथ यांचे प्राण वाचवले होते, तेव्हा राजाने त्यांना दोन वचन मागण्यास सांगितले होते आणि कैकयी यांनी ती योग्य वेळ आल्यावर मागणार असल्याचं म्हटलं होतं. हेच ते दोन वचन होते, त्यांनी भरतासाठी राजगादी आणि रामासाठी वनवास या रूपात मागितलं होतं.

शूर्पणखाने माता सीतेचं रूप धारण करणं

शूर्पणखाचं नाक कापण्याचा प्रसंगही चुकीचा दाखवण्यात आला आहे. प्रत्यक्षात जेव्हा भगवान राम विवाहाचा प्रस्ताव नाकारतात, तेव्हा शूर्पणखा लक्ष्मण यांच्याकडे जाते आणि जेव्हा तिला तिथेही निराशा मिळते, तेव्हा ती माता सीतेवर झडप घालते; तेव्हा लक्ष्मण तिचे नाक, कान आणि स्तन कापतात.

सीताहरण चुकीच्या पद्धतीने दाखवलं

‘रामायणम्’मध्ये सीताहरणाचा क्रम चुकीच्या पद्धतीने दाखवला आहे. यामध्ये हेच समजत नाही की त्याने माता सीतेचे अपहरण कसं केलं. फक्त सीतेला कुटियाच्या बाहेर येताना दाखवलं आणि नंतर पुष्पक विमान आलं. प्रत्यक्षात माता सीता हरणानंतर विलाप करतात, तो भाग सिनेमातून गायब आहे. उलट सीतेला असं दाखवलं आहे, जणू काही त्या रावणासोबत स्वतःच्या संमतीनं जात आहेत.

ऋषी अगस्त्य यांची पत्नी चुकीची दाखवली

सिनेमात एक प्रसंग येतो, जिथे अगस्त्य ऋषी भगवान राम यांना दिव्य तुणीर प्रदान करतात. याच प्रसंगात त्यांची पत्नी माता सीतेला आभूषणे देताना दाखवलं जातं. इथे निर्मात्यांकडून सर्वात मोठी चूक झाली आहे. प्रत्यक्षात माता सीतेला आभूषणे अगस्त्य ऋषींच्या पत्नीने नाही, तर महर्षि अत्री यांच्या पत्नी माता अनुसूया यांनी भेट दिली होती.

हिंदी आणि इंग्रजी व्हर्जनमधील घोळ

भारतातील हिंदी व्हर्जनमधून काही महत्त्वाचे सीन्स गहाळ करण्यात आले आहेत, एवढंच नाही तर, परदेशातील इंग्रजी व्हर्जनमध्ये ते पाहायला मिळाल्यामुळे प्रेक्षकांचा संताप वाढला आहे.

भक्तीपेक्षा शक्तीप्रधान मांडणी

‘रामायण’ सिनेमा भक्तीभावापेक्षा एका भव्य ॲक्शनपटासारखा जास्त भासत असल्याचं अनेकांचं मत आहे. सोशल मीडियावर आणि समिक्षकांकडून देखील सिनेमासाठी संमिक्ष प्रतिसाद मिळत आहे.

Follow Us
मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्स...
Microsoft Services Down : मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्सना फटका; ई-मेल पाठवणं आणि उघडणं कठीण
गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
Ram Kadam On Thackeray Brothers : गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचा फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता
Price Rate Hike : भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचाही फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता; सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं
विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती....
Aditi Tatkare On NCP Merger : विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती तटकरेंचा थेट सवाल
नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं...
Nagpur Students Meet Amit Thackeray : नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं प्रकरण काय?
मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं....
Dharashiv : मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं; तुळजापूर तालुक्यात खळबळ
माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप....
Rahul Gandhi : माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप; पृथ्वीराज चव्हाणांचंही मोठं विधान, म्हणाले....
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
NCP Merger : Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना...
NCP : सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना दत्तात्रय भरणेंनी दिला पूर्णविराम
छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? ठाकरेंचा आरोप
Raj Thackeray On Chhath Pooja : छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? राज ठाकरेंचा मोठा आरोप