Kishori Pednekar | करण जोहरच्या पार्टीत कोणता मंत्री होता ते सिद्ध करा, किशोरी पेडणेकरांचं आशिष शेलारांना चॅलेंज

Kishori Pednekar | करण जोहरच्या पार्टीत कोणता मंत्री होता ते सिद्ध करा, किशोरी पेडणेकरांचं आशिष शेलारांना चॅलेंज

| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Dec 20, 2021 | 12:47 PM

तुम्हाला आता एक चॅलेंज आहे. तुम्ही त्यांना विचारा नक्की कोण होता. आता त्यांना पुरावे देण्याची मागणी करावी. नक्की कोण मंत्री होता याची माहिती द्या नाहीतर जनता आणि माध्यमांची माफी मागा,असं आव्हान किशोरी पेडणेकर यांनी आशिष शेलार यांना दिलं आहे.

आपल्याला राजकीय सत्ता हवी असते, तुम्हाला तर सत्ता हवीच असते. मी मुंबईची प्रथम नागरिक आहे. तुम्ही आमच्यावर शिंतोडे उडवले. मी त्याला बघेनचं, महिला आघाडी, महाविकास आघाडी सरकार म्हणून बघून घेऊ, असा इशारा किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे. तुमच्या घाणेरड्या पत्रानं खचून जाणारी किशोरी पेडणेकर नाही. तुम्हाला आता एक चॅलेंज आहे. तुम्ही त्यांना विचारा नक्की कोण होता. आता त्यांना पुरावे देण्याची मागणी करावी. नक्की कोण मंत्री होता याची माहिती द्या नाहीतर जनता आणि माध्यमांची माफी मागा,असं आव्हान किशोरी पेडणेकर यांनी आशिष शेलार यांना दिलं आहे. मुख्यमंत्र्यांशी बोलले, आयुक्तांशी बोलले आहे. कोरोना विषाणू संसर्ग होऊ नये म्हणून पंतप्रधान जागरुकता पसरवत असतात. माझा सवाल आहे की महाराष्ट्र आणि कर्नाटक एकाच पटलावर आहे. माझा सवाल आहे त्यांना महाराष्ट्राला एक न्याय आणि कर्नाटकला एक न्याय का? असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी केलाय.

Follow Us