Metro 9 Inauguration | मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मेट्रो 9 मार्गीकेचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबईतील मेट्रो 9 मार्गीका प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहे. ही मुंबई मेट्रो आजपासून दहिसर- काशिगाव मर्गावर धावणार आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या नव्या मार्गीकेचे उद्घाटन होणार आहे.
मुंबईतील मेट्रो 9 मार्गीका प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहे. ही मुंबई मेट्रो आजपासून दहिसर- काशिगाव मर्गावर धावणार आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या नव्या मार्गीकेचे उद्घाटन होणार आहे. सत्ताधारी मान्यवर आज एमएमआरडीएच्या महत्त्वाच्या प्रकरल्पाचं लोकार्पण करतील. यामुळे मीरा- भायंदर येथीलही प्रवाशांची वाहतुककोंडीतून कायमची सुटका होईल. असे सांगितले जात आहे.
आतापर्यंत अनेक ठिकाणी मुंबई मेट्रो सेवेत रुजू झाली असून मुंबईतील मेट्रो प्रकल्पाला प्रवाशांचा उतुंग प्रतिसाद लाभत आहे. आता या प्रकल्पाला नागरिक कसा कसा प्रतिसाद देतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज असलेल्या मेट्रोला छानपैकी सजवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या कामाचंदेखली आजच शुभारंभ होणार आहे.
Published on: Apr 07, 2026 11:11 AM
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर
'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं
कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ

