VIDEO : Nevneet Rana On Court Rules | कोर्टाच्या आदेशाचं पालन पुढेही करणार : नवनीत राणा
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मीडियाशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं होतं. तसेच पोलिसांनी आपल्याला चांगली वागणूक दिली नसल्याचं सांगतानाच राज्य सरकारने आपल्यावर अन्याय केल्याचा दावाही नवनीत राणा यांनी केला होता. राणा यांच्या या विधानाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. राणा यांनी कोर्टाने घालून दिलेल्या अटी आणि शर्तीचा भंग केल्याप्रकरणी कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचं सरकारी वकील प्रदीप घरत यांनी म्हटलं आहे.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मीडियाशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं होतं. तसेच पोलिसांनी आपल्याला चांगली वागणूक दिली नसल्याचं सांगतानाच राज्य सरकारने आपल्यावर अन्याय केल्याचा दावाही नवनीत राणा यांनी केला होता. राणा यांच्या या विधानाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. राणा यांनी कोर्टाने घालून दिलेल्या अटी आणि शर्तीचा भंग केल्याप्रकरणी कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचं सरकारी वकील प्रदीप घरत यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे नवनीत राणा यांनी आपण कोर्टाच्या अटी आणि शर्तींचा भंग करणारं कोणतंही विधान केलं नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मी कोर्टाच्या आदेशाचं नेहमीच पालन केलं आहे. आम्ही कोर्टाचा नेहमीच सन्मान करतो, असंही नवनीत राणा यांनी सांगितलं.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..

