मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार
मुंबईत ओबीसी समाजाच्या प्रस्तावित आंदोलनाला मुंबई पोलिसांनी दुसऱ्यांदा परवानगी नाकारली आहे. 1 सप्टेंबर आणि त्यानंतर 2 सप्टेंबर रोजी आंदोलनासाठी परवानगी मिळावी, असे अर्ज ओबीसी कार्यकर्त्यांनी मुंबई पोलिसांना सादर केले होते. मात्र, दोन्ही वेळेस मुंबई पोलिसांनी हे अर्ज फेटाळून लावले आहेत. लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखालील ओबीसी समाजाने आपल्या मागण्यांसाठी मुंबईत आंदोलन करण्याची तयारी दर्शवली होती. मराठा […]
मुंबईत ओबीसी समाजाच्या प्रस्तावित आंदोलनाला मुंबई पोलिसांनी दुसऱ्यांदा परवानगी नाकारली आहे. 1 सप्टेंबर आणि त्यानंतर 2 सप्टेंबर रोजी आंदोलनासाठी परवानगी मिळावी, असे अर्ज ओबीसी कार्यकर्त्यांनी मुंबई पोलिसांना सादर केले होते. मात्र, दोन्ही वेळेस मुंबई पोलिसांनी हे अर्ज फेटाळून लावले आहेत. लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखालील ओबीसी समाजाने आपल्या मागण्यांसाठी मुंबईत आंदोलन करण्याची तयारी दर्शवली होती.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यात सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, ओबीसी समाजाची आपली भूमिका मांडण्यासाठी आणि मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हे आंदोलन महत्त्वपूर्ण मानले जात होते. मुंबई पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून परवानगी नाकारल्याचे सूत्रांकडून समजते. या नकारामुळे ओबीसी समाजात नाराजी व्यक्त होत असून, पुढील रणनीतीबाबत चर्चा सुरू आहे.
