Mumbai Children Hostage : …अन् त्याचा प्लॅन फसला, मुलांसह स्टुडिओ पेटवण्याची धमकी, पवईच्या स्टुडिओत घडलं काय?
मुंबईतील पवई येथे वेब सिरीज ऑडिशनच्या नावाखाली एका स्टुडिओत 17 मुलांना ओलीस ठेवण्यात आले होते. दुपारच्या जेवणासाठी मुले बाहेर न आल्याने हा प्रकार उघडकीस आला. मुंबई पोलिसांनी, विशेषतः पवई पोलिसांनी, तातडीने कारवाई करत सर्व मुलांची सुखरूप सुटका केली. आरोपी रोहित आर्यला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
मुंबईतील पवई येथील महावीर क्लासिक इमारतीमध्ये वेब सिरीज ऑडिशनसाठी आलेल्या 17 मुलांना ओलीस ठेवण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली. दुपारच्या जेवणासाठी मुले बाहेर न आल्याने हा प्रकार उघडकीस आला. तत्काळ मुंबई पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पवई पोलिसांनी अत्यंत जलद गतीने कारवाई करत आर.ए. स्टुडिओमध्ये अडकलेल्या सर्व 17 मुलांची सुटका केली.
आरोपी रोहित आर्य याने मुलांना एअरगन आणि केमिकलच्या धाकाने धमकावले होते. बाथरूममधून आत शिरत पोलिसांनी हे बचावकार्य यशस्वी केले. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, झटापटीत जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमागील रोहित आर्यचा नेमका उद्देश काय होता, याचा तपास पोलीस करत आहेत. सर्व मुले सुखरूप असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं

