पावसाचा कहर! पहिल्या आठवड्यातच झाले नागरिकांचे हाल! प्रभादेवी रेल्वे स्थानकाबाहेर थेट…
मुंबईत पावसाने पहिल्याच आठवड्यात जोरदार हजेरी लावत नागरिकांची मोठी गैरसोय केली आहे. प्रभादेवी रेल्वे स्थानक परिसरात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे कामावर जाणाऱ्या प्रवाशांना पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागला
मुंबईत पावसाने पहिल्याच आठवड्यात जोरदार हजेरी लावत नागरिकांची मोठी गैरसोय केली आहे. प्रभादेवी रेल्वे स्थानक परिसरात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे कामावर जाणाऱ्या प्रवाशांना पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागला. अनेकांनी गुडघाभर पाण्यातून चालत स्टेशन गाठले.
सकाळच्या वेळेतच रस्ते आणि स्थानकाबाहेरील परिसर जलमय झाल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला. काही ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पावसाचे पाणी तुंबल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. सोशल मीडियावरही प्रभादेवी परिसरातील पाणीसाच्याचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. हवामान विभागाने पुढील चार दिवस मुंबई आणि उपनगरांमध्ये जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
Published on: Jul 02, 2026 10:06 AM
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का

