मुंबईतील दादर, सायन, माटुंगा परिसरात मुसळधार पाऊस

मुंबईत काल रात्रीपासून थांबून थांबून पाऊस पडत आहे. त्यामुळेच मुंबई उपनगरात वेगवेगळ्या ठिकाणी पाणी जमण्यास सुरुवात झाली आहे. सायन पूर्व या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबले की जणू या भागाला नदीचे स्वरूप आले आहे.

मुंबई शहरासह उपनगरात जोरदार पाऊस कोसळत आहे. रात्रीपासून पावसाचं धुमशान पहायला मिळत आहे. दादर, सायन, माटुंगा परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दादर, हिंदमाता, सायन किंग्ज सर्कल येथे सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. अनेक भागांमध्ये दीड ते दोन फूटांपर्यंत पाणी साचलं होतं. यामुळे दुचाकी आणि चारचाकींचे टायर देखील पाण्याखाली गेले होते तर सकाळी ऑफिसला जाणाऱ्या मुंबईकरांची पावसाने चांगलीच तारांबळ उडवली

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI