Mumbai Water Logging : ‘तो’ आपल्याला घाबरतोय… साचलेल्या पाण्यात दिसला साप अन् लोकांची पळापळ, बघा VIDEO
पावसाच्या साचलेल्या पाण्यात साप दिसत असल्याने नागरिकांना पाणी साचलेल्या भागातून जाताना अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
मुंबई आणि मुंबई उपनगरात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातलाय. मुसळधार पावसामुळे अनेक सखोल भागात आणि रस्त्यांवर पाणी साचलंय तर दुसरीकडे बैठ्या घरा-घरांत पावसाचं पाणी शिरलंय. यामुळे नागरिकांची चांगलीच दाणादाण उडाली आहे. लोक आपला जीव वाचवण्यासाठी घराची दारं लावून आहे त्या परिस्थितीत घराबाहेर सुरक्षित स्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करताना दिसताय. काही ठिकाणी पावसाच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित जागेवर स्थलांतरित करण्यासाठी एनडीआरएफचे पथक मदतीला सरसावलेत. मात्र या सगळ्यामध्ये एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला देखील पावसाच्या साचलेल्या पाण्यातून चालण्यास, वाट शोधण्यास भिती वाटेल. कारण साचलेल्या पाण्यात साप सुसाट पोहोताना दिसतोय. पाण्यातून बाहेर पडत असताना लोकांना अचानक त्यांच्या जवळ साप येताना दिसताय त्यांची एकच घाबरगुंडी उडाली. बघा व्हिडीओ
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...

