राहुल गांधी यांच्याप्रमाणे गोपीचंद पडळकर यांचीही आमदारकी रद्द करा; ‘या’ नेत्याची मागणी
Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गोपीचंद पडळकर यांना महाराष्ट्रमध्ये फिरणंही कठीण होईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने रमाबाई आंबेडकरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसंच त्यांची आमदारकीही रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. “पवार नावाची कीड महाराष्ट्रला लागली आहे” असं वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केलं होतं. त्या विरोधात राष्ट्रवादी युवक कॉग्रेसने तक्रार दाखल केली आहे. “गोपीचंद पडळकर यांनी पवार ही महाराष्ट्रला लागलेली कीड आहे. ती मुळासकट उपटावी लागेल, असं वक्तव्य इंदापूरच्या सभेत केलं. त्यामुळे राज्यभरातील पवार नावाच्या लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. आम्ही सुद्धा न्यायालयीन लढाई लढणार आहोत. पडळकरांची आमदारकी रद्द करण्याची मागणी करणार आहोत, असं राष्ट्रवादी युवकचे कार्याध्यक्ष यांनी सूरज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम

