Maratha Reservation Rally : जरांगे पाटलांचं आझाद मैदानावर आंदोलन अन् मराठ्यांच्या गर्दीमुळं मुंबई जाम, वाहतुकीला मोठा फटका
मनोज जरांगे यांच्या सह मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झालेत आणि यामुळे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी ही झाली. सीएसएमटी स्टेशन सह मुंबईमधल्या अनेक भागांमध्ये मराठा आंदोलकांची गर्दी पाहायला मिळतेय.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करण्यासाठी मनोज जरांगे काल आझाद मैदानात दाखल झालेत. आरक्षणाच्या मागणीसाठी हजारोच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत पोहोचले आहेत. त्यामुळे मुंबईची वाहतूक कोलमडलेली पाहायला मिळाली. एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देणारे आंदोलक या ठिकाणी मोठ्या संख्येने दिसून आले. सीएसएमटी स्टेशनवर आणि मुंबईमधल्या अनेक भागांमध्ये मराठा आंदोलक दिसत होते. मोठ्या प्रमाणात आलेले मराठा आंदोलक आणि त्यांच्यासोबत असलेली त्यांची वाहने यामुळे रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला पाहायला मिळाला. एका ठिकाणी गणेशोत्सव सुरू असताना दुसरीकडे सुरू असणारे हे आंदोलन त्यामुळे मुंबईमधल्या अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी पाहायला मिळतेय. काल सीएसएमटी स्थानकात मराठा आंदोलकांची गर्दी पाहायला मिळाली. अनेक आंदोलक आराम करताना दिसले. तर दुसरीकडे चर्चगेटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. ईस्टर्न फ्री-वे वर वाहतूक कोंडी झाली. अनेक रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. आंदोलनामुळे मुंबईमधील रस्ते ब्लॉक झाल्याचही पाहायला मिळालं. सायन-पनवेल हायवेवर वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...

