Mumbai University | मुंबई विद्यापीठात राज्यपालांनी फेटाळला युवासेनेचा प्रस्ताव

अधिसभा बैठकीत युवा सेनेचे अधिसभा सदस्य काळी टोपी घालून आणि काळी फीत लावून राज्यपाल आणि कुलगुरु यांच्याविरोधात आपला निषेध नोंदवणार आहेत. युवा सेना अधिसभा सदस्यांनी निषेधाची पोस्टर्स बनवली आहेत

मुंबई विद्यापीठात शिवसेना प्रणित युवा सेना विरुद्ध राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि कुलगुरू वाद शिगेला पोहोचला आहे. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये मास्टर दीनानाथ मंगेशकर संगीत महाविद्यालयासाठी आवश्यक जागेचा प्रस्ताव राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी फेटाळला. मुंबई विद्यापीठाच्या आज होणाऱ्या अधिसभा बैठकीत याचे पडसाद उमटणार आहेत.

अधिसभा बैठकीत युवा सेनेचे अधिसभा सदस्य काळी टोपी घालून आणि काळी फीत लावून राज्यपाल आणि कुलगुरु यांच्याविरोधात आपला निषेध नोंदवणार आहेत. युवा सेना अधिसभा सदस्यांनी निषेधाची पोस्टर्स बनवली असून अधिसभा बैठकीत ती झळकवणार आहेत. मास्टर दीनानाथ संगीत महाविद्यालयासाठी राज्य सरकार अनुकूल, पण राज्यपाल प्रतिकूल असल्याने वाद उद्भवला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI